Advertisement

कोरोना नष्ट झाल्याची निवडणूक आयोगाची खात्री पटली

प्रजापत्र | Saturday, 08/01/2022
बातमी शेअर करा

बीड -राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सोमवारपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात येणार असून हॉटेल, रेस्टोरंट,सिनेमागृह,सलून आदी ठिकाणी ५० % क्षमतेने ग्राहक घेतले जाणार आहेत. तसेच रात्रीची जमावबंदी आणि लग्न सोहळे, अंत्ययात्रा यासाठी ५० आणि २० लोकांची घालून दिलेली मर्यादा कायम राहणार आहे.
राज्य सरकारने शनिवारी राज्यासाठी नवीन निर्बंध जरी केले असून त्याची अंमलबजावणी सोमवार (दि.१०) पासून होणार आहे. यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात पूर्व परवानगीशिवाय अभ्यागतांना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा विचार करावा असे सांगण्यात आले आहे. खाजगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवावी असे निर्देश आहेत.
लग्नासाठी ५०, सांस्कृतिक कार्यक्रम ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना उपस्थित राहता येणार आहे. हॉटेल, सिनेमागृह, सलून , शॉपिंग मॉल आदी ठिकाणी क्षमतेच्या ५० % प्रवेश देता येणार असून ते देखील लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच  द्यावेत असे निर्देश आहेत. सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी लसीकरण आवश्यक  आहे. 

Advertisement

Advertisement