Advertisement

गॅस सिलेंडर दुर्घटना झाल्यास कसा कराल विमा दावा, जाणून घ्या प्रक्रिया

प्रजापत्र | Saturday, 08/01/2022
बातमी शेअर करा

Gas Cylinder Blast Claim: गॅस सिलेंडर स्फोट होऊन जीवितहानी झाल्यानंतर इंधन कंपन्यांकडून विमा दिला जातो. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अपघात होऊ नये यासाठी इंधन कंपन्या सुरक्षितेच्या दृष्टीने 100 टक्के प्रयत्न करतात. देशामध्ये सिलेंडर सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी सर्वोच्च मानके पूर्ण करण्यावर भर दिला जातो. 

एलपीजी गॅस विमा पॉलिसी ही सामुहिक विम्यासारखी (ग्रुप इन्शूरन्स) आहे. हा विमा सर्व इंधन कंपन्या घेतात. भारतात सर्व डिलर्सकडूनदेखील ग्रुप इन्शूरन्स घेतला जातो. हे सर्व एलपीजी ग्राहकांना लागू होते. देशातील बहुतांशी लोकांना याबाबतची माहिती नसते. दुर्घटनेनंतरच्या दु:खात असल्याने लोकांना याचा विसर पडतो. त्यातून लोकांकडून विमा दावा केला जात नाही. मात्र, आपण या नियमांबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे.

 

 

गॅस सिलेंडर दुर्घटना झाल्यास विम्याचा दावा कसा कराल?

गॅस सिलेंडर दुर्घटना झाल्यानंतर लवकरात लवकर गॅस वितरकाला शक्य तेवढ्या लवकर लिखित स्वरुपात माहिती द्यावी. 

पीडित कुटुंबाने माहिती दिल्यानंतर गॅस वितरकाने संबंधित इंधन कंपनी, विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. 

गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झालेल्या दुर्घटनेवर विमा दावा करणाऱ्या पीडितांच्या कुटुंबाला विमा दावा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित इंधन कंपनी ग्राहकांची, नातेवाईकांची मदत करते. 

एलपीजी वितरकांकडे एलपीजी अपघातातील नुकसान भरपाईसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सर्व नोंदणीकृत एलपीजी ग्राहकांना विमा संरक्षण दिले आहे. नुकसानभरपाईबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधा.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) सारख्या इंधन कंपन्यांनी पीडितांना दिलासा देण्यासाठी विमा काढतात

Advertisement

Advertisement