Advertisement

कोरोना बाबत दिलासादायक बातमी ! नवीन चाचणी विकसित, फक्त पाचशे रुपयात होणार चाचणी

प्रजापत्र | Monday, 05/10/2020
बातमी शेअर करा

दिल्ली :  कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण हा देशात सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय आहे. चाचण्या वेगानं आणि अधिक प्रमाणात कशा होतील यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.चाचण्यांचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनं शास्त्रज्ञांच्या एका टीमनं महत्त्वाची आणि स्वस्तात होऊ शकणारी चाचणी विकसित केली आहे. प्रेग्नन्सी टेस्टप्रमाणेच या चाचणीचा परिणामही तात्काळ पाहता येईल.
क्रिस्पर नावानं ओळखल्या जाणाऱ्या जनुकीय एडिटिंग तंत्रज्ञानावर ही नवीन कोरोना चाचणी आधारित आहे. चाचणीच्या किटला नाव  देण्यात आलं आहे- 'फेलुदा.' 'फेलुदा'मुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे तासाभरात कळू शकेल आणि त्यासाठी येणारा खर्च पाचशे रुपयांच्याच आसपास असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.टाटा कंपनीकडून फेलुदाची निर्मिती केली जात आहे. कागदाचा वापर करून केली जाणारी कोव्हिड-19 ची जगातील पहिली टेस्ट असेल.
"ही अतिशय सोपी, सुटसुटीत, विश्वासार्ह आणि रास्त दरात होणारी चाचणी आहे," असं भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर के विजय राघवन यांनी  म्हटलं आहे 

 

Advertisement

Advertisement