नवी दिल्ली-कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो.
कोविड प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले तरच या छोट्या रॅली काढता येतील. दोन्ही डोस लागू केलेल्या लोकांना मेळाव्यात घेण्याचे आवाहन पक्षांना करता येईल. त्याशिवाय, निवडणूक-मतदानाच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चिंता निवडणूक आयोगाला आहे.