आष्टी- ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने तीस हजारांची लाच मागितली असल्याची तक्रार बीड एसीबी कडे करण्यात आली. तपासातून लाच मागितल्याची खात्री पटल्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी ग्रामसेवकाला गजाआड करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील गहूखेल/ वेलतूरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सय्यद शकील याने ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती केलेल्या कामाचे बिलचे नेट पेमेंट चेक देण्यासाठी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीकडे ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. त्या व्यक्तीची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबी कडे या प्रकरणी तक्रार केली. याप्रकरणी बीड एसीबीने चौकशी केली असता लाच मागितल्याची खात्री पटली. यावरून लाच मागितली म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बातमी शेअर करा