Advertisement

कसं असेल शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याचं स्वरुप ?

प्रजापत्र | Sunday, 04/10/2020
बातमी शेअर करा

 मुंबई : शिवसेनेची 53 वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.
राज्यात नोव्हेंबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना एकत्र जमता येणार नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा रद्द होणार की वेगळ्या पध्दतीने केला जाणार हा प्रश्न हजारो शिवसैनिकांच्या मनात आहे.याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण हा दसरा मेळावा व्हर्च्युअल पध्दतीने होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

 

Advertisement

Advertisement