Share Market Updates : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी निर्देशांकातही 20 अंकानी वाढ झाली. बाजारात तेजी कायम राहिल्याने सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. मात्र, काही वेळेनंतर निर्देशांक पुन्हा एकदा 60 हजारांच्या खाली आला.
सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 59,915 अंकावर होता. तर, निफ्टी निर्देशांक 17,825.50 अंकांवर ट्रेड करत होता. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा 40 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांक 5 अंकांनी वधारला. आशियाई शेअर बाजारात आणि मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. त्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजार सुरू होताच किंचीत घसरण झाली. त्यानंतर काही वेळेतच बाजारात खरेदीचा कल वाढला.
वधारणारे शेअर
बाजार सुरू होताच बँकिंग स्टॉकचे दर वधारले असल्याचे दिसून आले. बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शेअरमध्ये वाढ झाली. त्याशिवाय, मारुती सुझुकीच्या शेअर दरात वाढ झाल्याचे दिसून आले. बँकिग शेअरसोबत ऑटो क्षेत्रातील शेअर दरात चांगली वाढ दिसून आली. मात्र, बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्मॉल कॅप, मिड कॅप, एफएमसीजी, एनर्जी, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर दरात घसरण झाली.