Delhi Weekend Lockdown : जगासह देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू यापूर्वीच लागू करण्यात आला होता. दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) ची आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगानं वाढणारे कोरोनाचे आकडे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला होता. दिल्लीमधील पॉझिटिव्हिटी रेट वेगानं वाढत आहे.