मुंबई-कोरोनासोबत ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेमार्फत जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील झालेल्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात करोनाचे संक्रमण वाढत असताना राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील असे चहल यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिकेने यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. तसेच राज्यभरातील शाळांबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा