बीड दि.३१ – जिल्हयातील वाढते अपघाताचे व वाहन चालक यांचे अपघाती निधन होण्याचे प्रमाण लक्षात घेता, मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, दिनांक 1 जानेवारी 2022 पासुन बीड जिल्हयात NO HELMET NO PETROL लागू करण्यात येत आहे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखानुसार संपुर्ण बीड जिल्हयात मोटार सायकल यांची संख्या 2,40,959 आहे. जागतिक आरोग्य संघटना यांनी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या वाहनाच्या अपघाताच्या आकडेवारीनुसार भारतात जास्तीत जास्त अपघात हे मोटार सायकलने होत असतात व त्यामध्ये मोटार सायकल चालक हे हेल्मेट न वापरल्या कारणाने त्यांचा मृत्यु होतो व गंभिररित्या जखमी होतात. या मोटार सायकलच्या अपघातामध्ये तरुण मुले व मुली वय 18 ते 35 या वयोगटातील तरुण मुले नाहक प्राण गमावतात. बीड जिल्हयात जानेवारी ते सप्टेंबर 2021 दरम्यान दुचाकीच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 178 आहे, त्यामुळे ही बाब नाकारता येत नाही.
दरम्यान, कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकी वाहन चालक यांना बीड जिल्हयात मोटार सायकल चालवित असतांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात यावे व बीड जिल्हयातील सर्व पेट्रोल पंप चालक/मालक यांना मोटार सायकल धारकाने हेल्मेट परिधान न केल्यास अशा मोटार सायकल धारकांना पेट्रोल देण्यात येवू नये व लोकांमध्ये जागृती करावी व सदर बाबतीत आदेश हे तात्काळ लागू करावेत असे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी काढले आहेत.