Advertisement

वेगाने वाढतोय कोरोना

प्रजापत्र | Thursday, 30/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई-मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज तीन हजारांहून अधिक रुग्णांची रुग्णांची झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

        मुंबईत आज 3 हजार 671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाच मृत्यू नाही. याशिवाय, 371 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 49 हजार 159 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 96 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 हजार 360 रुग्ण सक्रीय आहेत.

Advertisement

Advertisement