Advertisement

लग्नाहून परतणाऱ्या वाहनाचा अपघात

प्रजापत्र | Thursday, 30/12/2021
बातमी शेअर करा

सिल्लोड तालुक्यातील भराडी रोडवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. भराडी रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. यावर छोटा टेम्पो आदळून हा अपघात झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहे.


पिकअपने उसाचाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली.
या भीषण अपघाताची माहिती अशी की, घाटशेंद्रा (ता.कन्नड) येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे मंगरूळ (ता.सिल्लोड) येथे येत असतना सिल्लोड शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोढा फाटा येथे उसाने भरलेला ट्रॅक्टरवर पिकअप व्हॅन क्रमांक (एम. एच. 20.सी. टी.2981) आदळून मोठा अपघात घडला अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की पीकअप वाहणाचे दोन तुकडे होऊन वाहन अस्ताव्यस्त झाले.अपघातामध्ये मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ, दोन सख्ख्या जावा आहेत.

 

मृतांची नावे

अशोक संपत खेळवणे (वय.52)
लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (40)
संजय संपत खेळवणे (44)
रंजनाबाई संजय खेळवणे (40)
जिजाबाई गणपत खेळवणे (60)
संगीता रतन खेळवणे (35)

 

जखमींची नावे
कासाबाई भास्कर खेळवणे (40)
सार्थक आजीनाथ खेळवणे (8)
आजीनाथ शेषराव खेळवणे (44)
गणेश सुखदेव बोरडे (19)
आकाश रमेश बोरडे (18)
ऋषिकेश गोविंदराव आरके (20)
संतोष गणपत खेळवणे (30)
धुळाबाई नारायण बोरडे (50)
दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे (45)
ओमकार रतन खेळवणे (16)
सुभाष राजेश खेळवणे (45)
सुलोचना आत्माराम खेळवणे (55)
सुरेश विठ्ठल खेळवणे (50) सर्व रा.मंगरूळ
कलाबाई बाबू म्हस्के (40 रा. अन्वी ता.सिल्लोड)

 

दरम्यान, अपघातातील 6 मृतदेहांवर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर काही जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात तर काहींना औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात पाठविन्यात आले.
 

Advertisement

Advertisement