Advertisement

आरोग्य भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय

प्रजापत्र | Wednesday, 22/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई-राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगली खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित केले होते. यावर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. तसेच आरोग्य भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय देखील त्यांनी घेतला असून गट ड ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेतली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

 

           टोपे म्हणाले,गट ड ची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांकडून एकही पैसे घेण्यात येणार नाही असे ते म्हणाले.यावेळी फडणवीस यांनी न्यासा कंपनीला २१ जानेवारी २०२१ ला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च २०२१ ला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पात्र केले. मात्र, चार कंपन्या डावलून न्यासाला काम का देण्यात आले? असा सवाल फडणवीसांनी केला होता. यावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, न्यासा कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. त्यानंतर न्यासाची निवड करण्यात आली. आरोग्य विभागाने पाच लोकांना याविषयी कळवले. पाच कंपन्यांकडून डेमो घेण्यात आला. आरोग्य आयुक्त, सार्वजनिक आरोग्य सचिवांनी परीक्षा घेतली. अॅप्टेकला ७१, जीए सॉफ्टवेअर ८३, मेटा आयटेकला ७८ आणि न्यासाला ९० ला गुण होते. असे स्पष्टीकरण राजेश टोपेंनी दिले आहे.

Advertisement

Advertisement