मुंबई-देशात नवा कामगार कायदा २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या कामगार कायद्यात आठवड्याला ४ दिवस काम आणि ३ दिवसांची सुट्टी असणार आहे. असं असलं तरी यासाठी कामाच्या ४ दिवसातील दिवसभराचे कामाचे तास वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ४ दिवस काम करताना दिवसाला १२ तास काम करावं लागणार आहे. कारण या कायद्यात आठवड्याला ४८ तास काम करण्याची मर्यादा तशीच ठेवली आहे. त्यामुळे ३ सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कामगारांना आठवड्यातील ४ दिवस ८/९ तासांऐवजी १२ तास काम करावं लागेल.
नवा कामगार कायदा कधी लागू होणार?
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, पुढच्या आर्थिक वर्षात भारतात नवा कामगार कायदा लागू होईल. नव्या कायद्यामुळे रोजगार आणि कार्यपद्धतीवर संबंधित व्यवस्थेत बदल होतील. कर्मचाऱ्यांचे पगार, कामाचे तास आणि आठवड्यांच्या दिवसांची संख्या यावर सर्व अवलंबून असणार आहे.