Advertisement

'स्वाराती' च्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे लाक्षणिक उपोषण

प्रजापत्र | Monday, 20/12/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-राज्यातील सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी 'स्वाराती' च्या अस्थायी प्राध्यपकांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले आहे. आज दिनांक 20 डिसेंबरला करण्यात येत असलेल्या आंदोलनात 'स्वाराती' चे अस्थायी प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

या संदर्भात अधिष्ठाता मार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हीड काळात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांनी अहोरात्र रुग्णसेवा दिलेली आहे. या कामाची दखल घेवून ना. अमित देशमुख यांनी अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमीत करुन शासकिय सेवेत सामावुन घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु वारंवार पाठपुरावा करुन देखील कोव्हीडची लाट संपताच शासनाने अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्या अनुषंगाने कोव्हीड काळात काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक यांचे समावेशन करण्याचे आश्वासन पुर्ण न झाल्यामुळे आम्ही तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेले सर्व शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक शासनाचे लक्ष वेधन्याच्या दृष्टीने दिनांक 20 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून सामुहीक रजा आंदोलन (अत्यावश्यक सेवा वगळता) करीत आहोत आणि त्याच बरोबर आम्ही 20 डिसेंबरलाच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात शांततेने कॅन्डल मार्च काढण्याचे ठरविले आहे.

त्यानंतरही शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्यास सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक आझाद मैदान, मुंबई येथे सामुहिक बेमुदत उपोषण करणार आहोत. तरी कृपया तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत सहाय्यक प्राध्यापकांच्या समावेशानाबाबत आपण गंभीरपणे दखल घ्यावी आणि आमच्या रास्त मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात ल्या आहेत.या निवेदनावर डॉ. योगेश गालफाडे, डॉ. अमित लोमटे, डॉ. रमेश लोमटे, डॉ. मंगल के. चौरे, डॉ. एम. सावंत, डॉ. अमोल शिंदे, डॉ. गणेश ताटे, डॉ. आरती बर्गे, डॉ. विनय नाळपे डॉ. पुष्पा राजन यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.

Advertisement

Advertisement