बीड दि.1 (प्रतिनिधी) : गेवराई नगरपालिकेने दिलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने खो घातला आहे. प्रस्तावित हद्दवाढ मुळ क्षेत्राच्या तिप्पट असताना हद्दवाढ भागातील लोकसंख्या निव्वळच कमी असल्याचे सांगत नगरविकास विभागाने हा प्रस्ताव फेटाळला आहे.
गेवराई नगरपालिकेने नगरविकास विभागाने हद्दवाढीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र सदर प्रस्तावात ज्या भागांचा समावेश करण्यात आला आहे त्या सर्व भागांना एकत्रित केले तर मुळ क्षेत्राच्या तीन पटीहून अधिक क्षेत्र नवीन हद्दवाढीत येते मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास या सर्व भागातील लोकसंख्या केवळ 1226 इतकी आहे. त्यामुळे इतक्या कमी लोकसंख्येसाठी इतक्या मोठ्या भागातील हद्दवाढीचा प्रस्ताव कसा करता येईल असा सवाल करत नगरविकास विभागाने या प्रस्तावाला खो घातला आहे. या संदर्भात सुधारीत प्रस्ताव देण्याचे निर्देश नगरविकास विभागाने बीडच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
बातमी शेअर करा