माजलगाव-शहराजवळील पाथरी माजलगाव महामार्गावरील पेट्रोल पंपावर रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी एक हजार लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील पाथरी माजलगाव महामार्गावरील वचिष्ट रोहिदास डाके यांच्या नवीन अन्वयराजे पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे. दोन दिवसांत पंप सुरू होणार होता त्यामुळे इंधन भरले. पंप सुरू करण्यापूर्वी घटनास्थळी आल्यानंतर त्यांना डिझेल गायब असल्याचे दिसले. पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एकूण ९४ हजार रुपयांच्या डिझेल चोरीचा गुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई राठोड करीत आहेत.
बातमी शेअर करा