Advertisement

सामाजिक गुन्ह्यांना समाजातूनच पायबंद घाला -आर.राजा

प्रजापत्र | Friday, 17/12/2021
बातमी शेअर करा

 

 

  नेकनूर - दि १६ अशोक शिंदे 

 

नेकनूर पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीच्या वेळी बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जनता संवाद घेतला. गुरुवार ता. १६ रोजी नेकनूर पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी होती. त्यासाठी पोलिस अधीक्षक आर राजा हे नेकनूर मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेकनूर सह परिसरातील सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील,पत्रकार व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या व आपल्या गावच्या अडीअडचणी ची विचारपूस केली. या दरम्याम समाजातील शेती , बंधाचे वाद, भावा भावातील भांडणे ,तंटे या घटनांचे वाद विकोपाला न जाता तिथेच मिटवेत अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी समाजातीलच नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.  

 

 यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येक जण मी समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून जर चांगले व प्रामाणिक काम केले व कायद्याचे पालन करत गावातील तंटे आपापसात मिटवून त्या तंट्याचे भांडणात रूपांतर होणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले. तसेच व्यसनामुळे अनेक गुन्हे घडत असून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी केज चे पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत,नेकनूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.शेख मुस्तफा नेकनूर चे सरपंच दादाराव काळे , ग्रामपंचायत सदस्य चक्रधर शिंदे , खालेद भाई , तुळाजीराम शिंदे , पत्रकार अशोक शिंदे , सुरेश रोकडे ,मनोज गव्हाणे , विकास नाईकवाडे , सुरेश रोकडे ,आर्षद शेख , पोलीस कर्मचारी ,अनेक गाव चे पोलीस पाटील ,नागरिक आदी जण उपस्थित होते

Advertisement

Advertisement