Advertisement

तर एसटीचे कर्मचारी होणार बडतर्फ (Terminate )

प्रजापत्र | Tuesday, 14/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई: तब्बल महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून सुरु असलेल्या एसटीच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्याचे परिवहन मंत्री यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देऊ केली होती. मात्र, त्यानंतरही बहुतांश कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाने (ST) कारवाईचा पहिला गेअर टाकला आहे. त्यानुसार आता नव्या वर्षात एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावले जाईल. यासाठी त्यांना तीनवेळा संधी दिली जाईल. यावेळी गैरहजर राहिल्यास त्यांना बडतर्फीची (Termination )  नोटीस धाडली जाईल. या नोटीसला सात दिवसांच्या अवधीत उत्तर न दिल्यास संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी बडतर्फ केले जाईल. त्यामुळे आता यावर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. किमान या भीतीने तरी कर्मचारी पुन्हा कामावर परतणार का, हे पाहावे लागेल.
 

Advertisement

Advertisement