बीड : अतिक्रमणरहित नकाशा देण्यासाठी लाच घेताना गेवराईतून एका भूमापकासह झेरॉक्स सेंटर चालविणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला एसीबीने अटक केली आहे. एसीबीचे पोलीस उपाधीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने सदर कारवाई केली.
भूमिअभिलेख विभागात सुरु असलेली लाचखोरी चर्चेचा विषय असतानाच आता एसीबीने गेवराईत सापळा रचून एका भूमापकाला ताक केली आहे. आसदखान पठाण हा गेवराईच्या भूमिअभिलेख कार्यालयात भूमापक म्हणून कार्यरत आहे. त्याने एका व्यक्तीला अतिक्रमण रहित नकाशा देण्यासाठी लाचेही मागणी केली होती. यापूर्वी तक्रारदाराकडून साडेतीन हजार रुपये घेतल्यानंतर गुरुवारी आणखी एक हजार रुपये घेताना एसीबीने त्याला अटक केली असून त्याच्या सोबतच झेरॉक्स सेंटर चालक मयूर कांबळे यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्य विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा