Advertisement

बिग ब्रेकिंग : विमा कंपनीने खरिपाच्या विमा भरपाईबाबत (crop insuarance claim ) केली ही घोषणा

प्रजापत्र | Thursday, 09/12/2021
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात २०२१ च्या खरीप हंगामात झालेल्या  प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. त्यांच्यासाठी आता विमा कंपनीने मोठी घोषणा (announcement )  केली आहे. विमा कंपनीने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले असून मंडळ निहाय पीक निहाय नुकसानीचा अंदाज जाहीर केला आहे.

 

बीड जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा घेतलेल्या अग्रीकल्चरल इन्शुअरन्स कम्पनी ऑफ इंडिया चे  व्यवस्थापक एस. व्ही. शेट्टी  जिल्हाधिकाऱ्यांना पात्र पाठविले असून त्यात सॅम्पल सर्व्हेच्या आधारे बीड जिल्ह्यात ३६० कोटींचा क्लेम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे. विमा कंपनीने मंडळ आणि पीक निहाय नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला असून या ३६० कोटीच्या क्लेमला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यावर त्याचे वाटप सुरु करता येईल असे म्हटले आहे . जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंपनीने ५० ते ६० % नुकसानीच्या आधारे क्लेम तयार केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याचे संकेत आहेत.
 

Advertisement

Advertisement