Advertisement

परळी आगाराच्या चालकाने घेतले विष

प्रजापत्र | Thursday, 09/12/2021
बातमी शेअर करा

परळी  वै-काल बुधवारी परळी आगाराची बस परळी बीड दरम्यान धावली होती. याच बस चालकांने आज सकाळी परळी बस डेपो मध्ये येऊन विषप्राशन केले असुन त्या वाहकाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.विषप्राशन का केले याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

 

 

परळी आगाराचे एस.टी कर्मचारी गेल्या 34 दिवसापासुन कर्मचाऱ्यांना शासनात विलनीकरण करा या मागणीसाठी बेमुद्दत संपावर आहेत.परंतु काल पहिल्यांदाच नागनाथ गित्ते हे चालक आणि वाहक मोहन गित्ते हे कामावर हजर झाल्याने एस.टी.च्या अधिकारी व पोलिस संरक्षणात परळी बीड बस सोडण्यात आली होती.

 

 

परतु आज सकाळी नागनाथ साहेबराव गित्ते हे चालक परळी आगारात आला आणि त्यांने विषाप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.नागनाथ गित्ते यांनी का विषप्राशन केले हे अद्याप स्पष्ट नाही.नागनाथ गित्ते यांना अंबाजोगाई येथील स्वारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे. 

Advertisement

Advertisement