Advertisement

घरकुलांसाठी विना रॉयल्टी वाळू उपलब्ध करून द्या,आयुक्तालयाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

प्रजापत्र | Wednesday, 30/09/2020
बातमी शेअर करा

बीड : औरंगाबाद विभागात प्रधानमंत्री आवस योजनेतील ग्रामीण भागातील घरकुलांचे काम संथ गतीने सुरु आहे. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत वाळू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे घरकुलाच्या वाळूसाठी वाळूगट आरक्षित ठेवा आणि घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू विनारॉयल्टी उपलब्ध करून द्या असे निर्देश विभागीय आयुक्तालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने यापूर्वीच यासंदर्भातील निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद विभागात सध्या वाळूचे दर आकाशाला भिडले आहेत . वाळू मिळणे सर्वसामान्यांना अशक्य होत आहे. त्यातच ग्रामीण भागातील ज्या बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहेत, त्यांना घरकुलाच्या एकूण अनुदानाच्या किमतीत देखील वाळू मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यासंदर्भात राज्याच्या ग्राम विकास विभागाने यापूर्वीच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे काम वेगाने व्हावे यासाठी घरकुलनासाठी वाळू गट राखून ठेवावेत आणि प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू विनारॉयल्टी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन होत नसल्याची बाब ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी निदर्शनास आणून दिली होती.
त्यानंतर औरंगाबादच्या उपायुक्तांनी यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. आपापल्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचा आढावा घेऊन त्यानुसार काही वाळू गट आरक्षित ठेवावेत आणि घरकुलासाठी ५ ब्रास वाळू  विनारॉयल्टी देण्याच्या सूचना समाबनाधित महसूल अधिकाऱ्यांना द्याव्यात असे उपायुक्तांनी म्हटले आहे.

( http://prajapatra.com/390 - लिंक वर टच करून वाचा - कोरोनाची नवीन लक्षणे कोणती?)

 

 

Advertisement

Advertisement