बीड : बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीड आणि अंबाजोगाई शहरात विद्युत शवदाहिनी उभारण्याचा प्रस्ताव आहे, त्यासाठी अल्फा इक्विपमेंट्स या संस्थेला कार्यात आदेश देखील देण्यात आले आहेत, मात्र विद्युत शवदाहिनीसाठी आवश्यक बंदिस्त खोलीचं बीड आणि अंबाजोगाईच्या स्मशानभूमीत उपलब्ध नाही, त्यामुळे अगोदर खोली उपलब्ध करून द्यावी अशी विनंती सदर संस्थेने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीड आणि अंबाजोगाई शहरांमध्ये विद्युत शवदाहिनी उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी कार्यात आदेश देखील देण्यात आले. मात्र सदर संस्थेने बीड आणि अंबाजोगाईच्या स्मशानभूमीची पाहणी केल्यानंतर याठिकाणी विद्युत दाहिनी बसवण्यासाठी स्वतंत्र खोलीचं नसल्याचे समोर आले. तसेच विद्युत दाहिनीसाठी आवश्यक साहित्य साठवण्यासाठी देखील व्यवस्था नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता अगोदर बीड आणि अंबाजोगाईच्या स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनीसाठी खोल्या बांधून द्याव्यात आणि त्याठिकाणी ८० किलोवॅट इतक्या वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी अशी विनंती सदर संस्थेने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हा प्रशासन आता यासंदर्भात कोणाला निर्देश देते याकडे लक्ष आहे.
प्रजापत्र | Wednesday, 30/09/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा