Advertisement

मुंबईकर’ एजाज पटेलनं भारताला गुंडाळलं

प्रजापत्र | Saturday, 04/12/2021
बातमी शेअर करा

न्यूझीलंडचा ‘मुंबईकर’ फिरकीपटू एजाज पटेलने वानखेडे मैदानावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाजने एका डावात १० बळी घेत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. एका डावात १० बळी घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. भारताच्या मोहम्मद सिराजच्या रूपात एजाजने १०वा बळी घेतला आणि वानखेडे मैदानावर त्याच्या नावाचा जयघोष सुरू झाला.

 

 

कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.

Advertisement

Advertisement