नवी दिल्ली-इतर व्हॅक्सीनच्या तुलनेत कोवॅक्सीन ही लस ओमिक्रोन विषाणुशी लढण्यासाठी अधिक प्रभावी असल्याचा दावा इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने केला आहे.
आयसीएमआरनुसार, कोव्हॅक्सीन ही लस अधिक परिणामकारक असून कोणत्याही प्रकारच्या नवी विषाणुशीवर मात करण्यासाठी प्रभावी आहे. अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा या प्रकारच्या कोवीडच्या विषाणुवर कोव्हॅक्सीन अधिक परिणामकारक असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाला असल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे. नवीन विषाणुचा सॅम्पल मिळाल्यानंतर व्हॅक्सिनची परिणामकारकता पुण्यातील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी येथे केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. आयसीएमआरने कोव्हॅक्सीन ओमायक्रॉनवर अधिक परिणामकारक असल्याचा दावा केला असला तर कोव्हॅक्सीन निर्माता करणारी कंपनी भारत बायोटेकने यावर आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
बातमी शेअर करा