Advertisement

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 02/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई :  मिर्झापूर-2 सारख्या वेबसीरीजमध्ये ललितचे लोकप्रिय पात्र साकरणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांचे निधन झाले आहे. ब्रह्मा याला 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक औषधोपचार सुरु केले होते. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. दिव्येंदु शर्मा यांनी इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

 

तीन दिवस मृतदेह बाथरूममध्येच
या विषयी हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसारस,   ब्रह्मा याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो बाथरूममध्ये होता. त्याचा मृतदेह सलग तीन दिवस मुंबईतील वर्सोवा येथील घरात बाथरूममध्येच राहिला. सध्या मुंबई पोलीस त्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करत आहे. जेणेकरून त्याच्या मृत्यूचे योग्य कारण कळू शकेल.  वर्सोव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार म्हणाले की, आज दुपारी 12.30 वाजता पोलीस नियंत्रणाला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, यारी रोडवर असलेल्या इनलक्स नगर सोसायटीच्या डी विंग 13 क्रमांकाच्या खोलीत दुर्गंधी येत आहे, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डुप्लिकेट चावीने घर दरवाजा उघडला. पाहिले शौचालयाचा वास येत होता आणि शौचालयाचा दरवाजा उघडा होता, अभिनेत्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शौचालयात होता, जो पूर्णपणे कुजलेला होता.

 

32 वर्षीय ब्रह्मा मूळचा भोपाळचा!
ललितच्या पात्रामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला ब्रह्मा मिश्रा हा फक्त 32 वर्षांचा होता. भोपाळमधील रायसेन येथील रहिवासी असलेला ब्रह्मा केवळ दहावीपर्यंत शिकलेला होता. त्याचे वडील भूविकास बँकेत कार्यरत होते. ब्रह्माने मिर्झापूरसह केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 

2013 मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ मधून डेब्यू
मिर्झाने चित्रपटाची कारकीर्द 2013 पासून सुरु केली होती. त्याने ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटात सर्वप्रथम काम केले. तर 2021 मध्ये तापसी पन्नीसोबत त्याने ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटात काम केले.

Advertisement

Advertisement