Advertisement

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि थंडीने घेतला दोन जणांचा बळी

प्रजापत्र | Thursday, 02/12/2021
बातमी शेअर करा

शिर्डी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात आलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो ग्रामीण भागाला. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने पिकांचंही अतोनात नुकसान झालं आहे.दुसरीकडे अवकाळी पावसाने हवामानातही प्रचंड बदल झाला आहे. याचा फटका पिकांबरोबरच माणसांनाही बसतोय. पाऊस आणि थंडीने दोन जणांचा बळी घेतला आहे.शिर्डीत उदरनिर्वाहासाठी आलेल्या दोन जणांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळुन आले. गेल्या दोन दिवसा पासुन शिर्डीत कोसळत असलेला पाऊस आणि गारठ्यामुळे या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

शिर्डीतील नगर - मनमाड महामार्गावर एक आणि कणकुरी रोडवर लागत असलेल्या ओढ्या जवळ एक अश्या दोन ठिकाणी दोन जणांचे मृतदेह आढळून आले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जात दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. यातील एका मृत व्यक्तीजवळ काही कागदपत्र आढळून आली.कागदपत्रांवरच्या माहितीनुसार एकनाथ हाटे असं या मृत व्यक्तीचं नाव असू तो ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं राहणारा आहे. एकनाथ हाटे यांच्याकडे मिळवून आलेल्या कागदपत्रावरून त्यांचा कुटूंबियांना संपर्क साधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. तर दुसरा व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरु म्हणुन राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.गेल्या दोन दिवसांपासुन शिर्डीत थंडी आणि पाऊस कोसळत असल्याने शिर्डीतील भिक्षेकरु निवारा नसल्यानं थंडीत गारठुन जात आहेत. 

Advertisement

Advertisement