Advertisement

सोमवारीही बस सेवा ठप्प

प्रजापत्र | Monday, 29/11/2021
बातमी शेअर करा

बीड-२३ दिवसांच्या संपानंतर शनिवारी (दि.२७) एक दिवसासाठी बीड आगारातून लालपरी धावली.मात्र रविवार आणि सोमवारी चालक आणि वाहकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुन्हा दोन दिवसांपासून बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. 

 

                 बीड जिल्ह्यातील एसटीचे चालक आणि वाहकांनी विलनीकरणाचा निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार असल्याचे जाहीर केले असून वेतनवाढीच्या निर्णयानंतर बीड आगारातील प्रशासकीय विभाग,यांत्रिक विभागातील जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.मात्र चालक आणि वाहक संपावर ठाम असल्यामुळे शनिवारचा दिवस वगळता बीड बस स्थानकातून एकही बस धावली नाही.दरम्यान यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून एसटीच्या संपावर तात्काळ तोडगा निघावा अशी अपेक्षा प्रवाशी वर्गातून केली जाऊ लागली आहे.

 

विभाग नियंत्रकांचा धारूर दौरा 
एसटीचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी बीड जिल्ह्यातील संपावर तोडगा काढण्यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत.शनिवार बीड आगारातून ज्या बसेस धावल्या त्या मागे अजय मोरे यांचाच मोठा वाटा होता. कर्मचाऱ्यांचे आंदोलन एकीकडे सुरु असले तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ते बस सेवा पूर्ववत  करण्यासाठी प्रयत्न करत आहे.सोमवारी (दि.२९) त्यांनी धारूर आगाराला भेट देऊन कर्मचाऱ्यांना आंदोलन  मागे घेण्याचे आवाहन केले.

Advertisement

Advertisement