Advertisement

लॉकडॉऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावी लागतील

प्रजापत्र | Sunday, 28/11/2021
बातमी शेअर करा

ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

मिडिया रिपोर्टनुसार, कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. याच पार्श्वभूमीवर उद्याही मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे.​​​​​​​

 

शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने एनओसी दिली आहे. मात्र आज मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दरहिन्याला १०० सॅम्पल घेऊन म्युटेशनची तपासणी करण्यात येते.

 

केंद्राने दिल्या राज्यांना सूचना -

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ओमिक्रॉनच्या संदर्भात क्वारंटाईन आणि आयसोलेशनची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच प्रत्येकाला तातडीने आरटी-पीसीआर चाचणी वाढवून सक्रिय पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement