बीड - ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने काल नियमावली सादर केली असून कोरोनासह नवीन आलेला ओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. हेच सांगण्यासाठी आता थेट बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे गल्लीबोळात जावुन लसीकरणाचे महत्व सांगण्याबरोबर नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवुन आढावा घेत आहेत. आज दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी शहरातील मोमीनपुरा भागात गेले आणि त्याठिकाणी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. दरम्यान यानंतर जिल्हाधिकारी यांनी गेवराई शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवुन तेथील लसीकरणाचा आढावा घेतला.
बातमी शेअर करा