Advertisement

एसटी कर्मचारी कामावर रुजू पण...

प्रजापत्र | Saturday, 27/11/2021
बातमी शेअर करा

बीड-परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे इशारा दिल्यानंतर बीड आगारातील दीडशे पेक्षाअधिक कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र चालक आणि वाहक संपवार ठाम असल्यामुळे सकाळी 9.30 पर्यंत एकही बस बीड आगारातून बाहेर पडली नव्हती.विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी आज लालपरी पोलीस बंदोबस्तात धावेल असे सांगितले होते. मात्र चालक आणि वाहकांच्या आक्रमकेतेपुढे अद्याप एकही बस स्थाकाच्या बाहेर पडली नसल्याची माहिती असून दिवसभरात काय काय घडते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

विलानीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आक्रमक भूमिका घेतल्याने मागील २० दिवसांपासून लालपरी रस्त्यावर धावली नसल्याचे चित्र आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि राज्य सरकारप्रमाणे इतर भत्ते देऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले.तसेच जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला.यानंतर राज्यभरातून अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला असून बीडमध्ये प्रशासकीय विभाग,यांत्रिक विभागातील कर्मचारी सेवेवर रुजू झाले मात्र चालक आणि वाहक कर्तव्यावर येत नसल्याने लालपरी आज तरी धावणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

प्रशासकीय विभागातील ३५३ पैकी ११४ हजर  

कार्यशाळा (यांत्रिक)-४६८ पैकी २८ हजर

चालक-२ आणि वाहक-१ हजर

Advertisement

Advertisement