दिल्ली : कोरोना संसर्ग देशभरात वाढत असतानाच कोरोनाचा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होऊ लागल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कोरोनावरील उपचाराच्या संदर्भाने फुप्फुसावरच लक्ष केंद्रित केले जात असतानाच फुप्फुसासोबतच हृदय आणि मूत्राशयावर देखील कोरोनाचा आघात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळू लागले आहे.
देशातील कोरोना बळींचा आकडा जगाच्या तुलनेने जरी कमी असला तरी वाढते कोरोनाबळी चिंतेचा विषय आहे .कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन केले जात नसल्याने मृत्यूच्या नेमक्या करणाबाबत अजूनही पुरेशी माहिती. समोर येत नसली तरी आत्तापर्यंत कोरोना मुख्यतः फुप्फुसावर आघात करतो असेच सार्वत्रिक चित्र आहे. मात्र फुप्फुसासोबतच कोरोनामुळे हृदय,मूत्राशय आणि इतर अवयवांवर देखील आघात होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. कोरोनामुळे ज्या अनेकांचे बळी गेले आहेत त्यातील हृदय रोगाशी संबंधित बळींची संख्या भरीव आहे. रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या थेट हृदयात जाण्याने अचानक हृदय क्रिया बंद पडून रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासोबतच मूत्राशयावर देखील कोरोनाचा आघात होत असल्याची अनेक प्रकरने समोर आली आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर कोरोनावर उपचार करताना फुप्फुसासोबतच हृदय आणि मुत्राशय आणि इतर अवयव वाचवण्याचे देखील मोठे आव्हान आहे.
प्रजापत्र | Monday, 28/09/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा