बीड-मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील एसटी कामगारांचा संप आज संपणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना आज कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा ही दिला होता.मात्र त्यानंतर ही बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत बस सुरु होणार असल्याचे जाहीर केले.त्यामुळे आता राज्य सरकार काय पाऊले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली. पण, अॅड. सदावर्ते यांनी विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधाना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. 'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही आज सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ', असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला होता. मात्र शुक्रवारी सकाळी 9 नंतर ही बीड जिल्ह्यातून प्रवाशांसाठी एकही बस सुटली नव्हती.राज्यातील इतर जिल्ह्यातही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असून आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.