Advertisement

अखेर कड्यापर्यंत धावले रेल्वे इंजिन

प्रजापत्र | Thursday, 25/11/2021
बातमी शेअर करा

आष्टी-बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या ६० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून गुरुवारी (दि.२५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली.पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे या २६१ किलोमीटरच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नगर ते आष्टी या साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास एक इंजिन नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाले. अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले. सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे.

Advertisement

Advertisement