बीड-मागील २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलानीकरणाच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने यावर वारंवार तोडगा काढण्याचा प्रयत्न केला,मात्र कर्मचाऱ्यांनी एकच मागणी लावून धरली होती.अखेर बुधवारी (दि.२४) सायंकाळी ६.३० वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भरीव वाढ केल्याचे जाहीर केले.तसेच राज्य सरकार प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना इतर भत्ते देण्यात येतील अशी घोषणा केली आहे.या पत्रकार परिषदेला मंत्री उद्य सामंत,आ.गोपीचंद पडळकर,आ.सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती. यावेळी परब यांनी मात्र विलनीकरणाचा निर्णय समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येईल असे जाहीर केले आहे.
पत्रकार परिषदेत परब म्हणाले, यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी १० तारखेच्या आत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारत्मक आहे.समितीच्या निर्णयानंतर आम्ही विलानीकरणाचा देखील निर्णय घेणार आहोत मात्र सध्या आम्ही कर्मचाऱ्यांसाठी काही निर्णय घेतले आहेत.यामध्ये १-१० वर्ष या कालावधीत ज्यांची नौकरी झाली आहे त्यांना १२ हजारांवरून १७ हजार वेतन देण्यात येणार आहे,१०-२० वर्ष ज्यांची नौकरी झाली आहे त्यांना ४ हजारांची वाढ देण्यात येणार असून प्रत्येक कर्मचाऱ्याला भरीव वेतनवाढ आम्ही देत आहोत.यासोबतच राज्य सरकार प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना इतर भत्ते देण्यात येणार असल्याचे परब म्हणाले.दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर यावे असे आवाहन त्यांनी केले असून जे कामावर येणार कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
८ वाजेपर्यंत कळणार एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका
दरम्यान पत्रकार परिषदेनंतर परिवहन मंत्री अनिल परब,आ.गोपीचंद पडळकर,आ.सदाभाऊ खोत हे आजाद मैदानावर आज रात्री ७.३० वाजेपर्यंत जाणार असून यानंतर ८ वाजेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.हे आंदोलन कर्मचाऱ्यांचे असून त्यांना सरकारची भूमिका मान्य असेल तर थोड्यावेळात हे आंदोलन मिटलेले असेल असे पडळकर म्हणाले.