दिल्ली : राफेल प्रकरणात ऑफसेट कराराचे पालन होत नसल्याची टीका आता चक्क भारताच्या महालेखापाल आणि नियंत्रकांनीं (कॅग ) केली आहे. सुरक्षा खरेदी संदर्भातील कॅग चा अहवाल संसदेत मांडण्यात आला असून त्यात ऑफसेट नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ राफेलच नव्हे तर इतरही अनेक प्रकरणात ऑफसेट नियम पळाले गेले नसल्याचे कॅगने म्हटले आहे.
राफेल खरेदी करताना तंत्रज्ञान आणि इतर बाबतीत ऑफसेट करार करण्यात आला होता. राफेलच्या खरेदीच्या मोबदल्यात राफेलचे ऑफसेट पार्टनर दसाल्ट एव्हिएशन हे भारताला विमानासंसदर्भातील नवीन तंत्रज्ञान पुरविणार होते, मात्र ती अट पाळली गेली नसल्याचे निरीक्षण कॅगच्या अहवालात नोंदण्यात आले आहे. २००५ ते २०१८ या १३ वर्षात तब्बल ६६४२७ कोटीचे ४६ ऑफसेट करार केले गेले , मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निरीक्षण कॅग ने नोंदवले आहे. ५९ % इतक्याच कराराचे पालन झाल्याचे समोर आले आहे.
बातमी शेअर करा