अंबाजोगाई-दि.१५'त्या' अल्पवयीन पीडितेवरील अत्याचारप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन पीडित मुलीवर सहा महिन्यात चारशे जणांनी अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती असल्याची माहिती बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ.अभय वनवे यांनी दिली होती.याप्रकरणात पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती दिली होती. दरम्यान प्रथम या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमुख पेठकर यांच्याकडे होता.प्रकरणाची व्यापती पहाता तपास अधिकारी बदलून अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार याचा तपास करत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळे पथक निर्माण केले असून यातील चारशे ते पाचशे संशयित आरोपींचा तपास चालू आहे.सध्या या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली असून अप्पर सत्र न्यायाधीश व्हि.के.मांडे यांच्यासमोर हजर केले असता आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.