बीड-एसटी कर्मचार्यांनी गेल्या दहा दिवसांपासून संप पुकारलेला आहे. या संपाबाबत अद्यापही तोडगा निघाला नाही. संतप्त कर्मचार्यांनी शनिवारी (दि.१३) आंदोलनाच्या दहाव्या दिवशी सरकारचा दहावा घालून निषेध व्यक्त केला आहे.महामंडळाच्या कार्यालयासमोर कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन सुरुच असून या आंदोलनात अनेक कर्मचार्यांचा सहभाग आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचार्यांनी संप पुकारलेला आहे. या संपाला शनिवारी (दि.१३) दहा दिवस पुर्ण झाले असून अद्यापही शासनाने संपाबाबत तोडगा काढलेला नाही. त्यामुळे संपाच्या १० व्या दिवशी एसटीच्या कर्मचार्यांनी सरकारचा दहावा घालून निषेध व्यक्त केला. बीडच्या एसटी महामंडळ कार्यालयासमोर कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन सुरुच असून या वेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली.