Advertisement

"स्वाराती" मधील परिचारिकांचे काळय़ा फिती लावून कामकाज

प्रजापत्र | Saturday, 13/11/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-नगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे, या विरोधात शनिवारी (दि.१३) स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या वतीने काळय़ा फिती लावून काम काज करत आंदोलन  केले आहे.परिचारीकांचा काहीही दोष नसताना दोन परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.  एका परिचारीकेचे निलंबन करण्यात आले आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र परिचारीका संघटनेने  काळ्या फिती लावुन काम करत आहे.

 

           जिल्हा रुग्णालयातील आग लागलेली इमारत करोनाकाळात हस्तांतरित केले गेली. या इमारतीत वीज यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यरत असलेले डॉक्टर किंवा परिचारिकांचा काहीही संबंध नाही. आरोग्य विभागासह अन्य विभागांची यात चौकशी झाली नाही. त्यांचीही चौकशी केली जावी आणि डॉक्टर, परिचारिकांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.जर परिचारीकेवरील झालेली कारवाई रद्द केली नाही  व  आंदोलनाची दखल न घेतल्यास दिनांक१५ नोव्हेंबर पासुन बेमुदत संप करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी रेखा घोडके ,शेख रजिया,आशा यादव,सय्यद नजीर ,मनोहर किरण,भिसे पाटील,केंडे प्रमोद, रंजना माळवे  सह आदी परिचारिका उपस्थित होत्या.
 

Advertisement

Advertisement