Advertisement

दिवाळी सुट्ट्या संदर्भात चार दिवसांत दुसरे पत्र

प्रजापत्र | Friday, 12/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१२ – जिल्हयातील सर्व शाळांना दिवाळीच्या सुटटयांमध्ये दिनांक 10/11/2021 ऐवजी दिनांक 16/11/2021 पर्यंत वाढ करण्यात आली होती परंतु मा. सहाय्यक संचालक विभागीय उपसंचालक कार्यालय औरंगाबाद यांच्या दिनांक 11/11/2021 च्या पत्रानुसार औरंगाबाद विभागामधील सर्व जिल्हा परिषदांमध्ये दिनांक 20/11/2021 पर्यंत सुटटया घोषित केलेल्या आहेत. परंतु बीड जिल्हयातील सर्व शाळांना दिनांक 16/11/2021 पर्यंत सुटटया घोषित केल्या होत्या. त्यामुळे विभागातील शाळांच्या सुटटयांमध्ये विसंगती निर्माण झाली होती. तसेच सर्व शिक्षक संघटनांनी सुध्दा दिनांक 20/11/2021 पर्यंत वाढ करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन दिलेले आहे. दिलेल्या सुचनांप्रमाणे व जिल्हयातील सर्व शिक्षक संघटनांच्या मागणी नुसार बीड जिल्हयातील सर्व शाळांच्या दिवाळीच्या सुटटयाच्या कालावधीमध्ये अंतिमतः वाढ करुन दि. 16/11/2021 ऐवजी दि. 20/11/2021 पर्यंत दिवाळीच्या सुटटया घोषित करण्यात येत आहेत. दि.21/11/2021 रोजी रविवार असल्यामुळे दि. 22/11/2021 पासुन जिल्हयातील सर्व शाळा पुर्ववत सुरु होतील. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील. सुटटयाच्या कालावधीमध्ये विदयार्थ्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्याची सर्वस्वी जबाबदारी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांची राहील. संदर्भ क्र 1 मध्ये दिलेली टिप सर्व शाळांना लागू राहील. असे आदेश बीड जि. प.शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement