बीड-जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या आहाराविषयी कायम कोणत्या ना कोणत्या चर्चा सुरु असतात. काही ठिकाणी रुग्णांना सकस आहार दिला जातो. तर काही ठिकाणी अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णालयाच्या किचनला अन्न औषध प्रशासनाच्या वतीने भेट देऊन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या वतीने देण्यात आली.
सोमवारी (दि.२१) जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड किचनला अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार व अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांच्या वतीने अचानक भेट देऊन जेवणाच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी कामगार गाफिल असल्याचे समोर आले.किचनमध्ये काम करताना हातमोजे, टोपी, ऍप्रन वापरणे आवश्यक असताना याचे पालन जिल्हा रुग्णालयात होताना दिसून आले नाही. स्वच्छतेच्याबाबतीत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून उणिवा बाबतीत संबंधितांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील इतर कोव्हिड रुग्णालयाच्या किचन सेंटरलाही भेट देऊन तपासणी करण्यात येणार असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रजापत्र | Wednesday, 23/09/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा