Advertisement

आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला कराल तर.....

प्रजापत्र | Tuesday, 22/09/2020
बातमी शेअर करा

साथरोग कायद्यातीळ नवीन तरतुदीला लोकसभेची मंजुरी 
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० वर्ष जुन्या साथरोग कायद्यात केंद्र  सरकारने बदल केले असून आता साथरोग काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचारी अथवा डॉक्टरवर हल्ला केल्यास किंवा त्यांना मारहाण केल्यास संबंधितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. तसेच या गुंह्युसाठी ७ वर्षापर्यंत शिक्षा आणि दीड लाखापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी लोकसभेने या कायद्याला मंजुरी दिली असून राज्यसभेने यापूर्वीच या कायद्याला मंजुरी दिली आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा झटत असतानाच उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याच्या, त्यांना मारहाण करण्याच्या घटना वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर १३० वर्षांपूर्वीच्या साथरोग कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत . आता साथरोग कायदा लागू असताना उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा त्यांच्यावर हल्ला करणे अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून त्यासाठी ७ वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या सुधारणेला मंजुरी दिली असून राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. 

Advertisement

Advertisement