Advertisement

भर दिवाळीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्याकडून आत्महत्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Thursday, 04/11/2021
बातमी शेअर करा

प्रवीण पोकळे 
आष्टी दि.४-भर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कडा  बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.बाळू महादेव कदम ( ३५, रा.आष्टी ) असे चालकाचे नाव असून ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 
          आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. आज दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( एमएच २०,बीएल २०८६ ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे आणि वाहक यांनी त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

 

आगारप्रमुखच जबाबदार
माझ्या भावाने आज कर्तव्यावर जाणार नसल्याचे तीन दिवसापुर्वीच आगार प्रमुखांना सांगितले होते.परंतु आगार प्रमुखांनी त्यालाच बोलावून खडे बोल सुनावत तुला नोकरी गमवावी लागेल.नीट  काम कर म्हणत बळजबरीने कर्तव्यावर पाठविले या घटनेला जबाबदार हे आष्टी आगाराचे आगार प्रमुखच आहेत.
-संतोष कदम (बस चालकाचा भाऊ)

 

संपात फूट पडली अन... 
गेल्या पंधरा दिवसांपासून एस.टी.कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू असून,महाराष्ट्रातील जवळपास दिडशे आगार बंद आहेत.यामध्ये आष्टी आगारात माञ आपले काम सुरूळीत सुरू ठेवले असून,दररोज या आगारातून जवळपास ५५ बसेस सुरू आहेत.आष्टी आगारातील कर्मचा-यांनी संप केला परंतु या आगारात भरपूर संघटना असल्याने काही संघटनेचे सदस्य कर्तव्यावर जातात तर काही जण संपावर ठाम आहेत. गुरुवारी दुपारी दोन वाजता आष्टी आगाराचे आगार प्रमुख संतोष डोके यांनी वाहनचालक बाळू कदम यांना कर्तव्यावर येण्यास सांगितले.परंतु बाळू याने येण्यास नकार देताच त्यांना निलंबित करण्याची धमकी दिली. यानंतर  वाहन चालक बाळू कदम याला बळजबरीने आष्टी पुणे ही जादा बस क्र.एमएच २० बीएल २०८६ ही बस घेऊन अडीचच्या दरम्यान पुण्याला जाण्यास सांगितले. बस तीनच्या सुमारास कडा बसस्थानकावर आल्यानंतर वाहन चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. 

 

Advertisement

Advertisement