Advertisement

गोरगरीब जनतेला मूठभर साखर देण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नाही-मस्के

प्रजापत्र | Wednesday, 03/11/2021
बातमी शेअर करा

बीड -आजच्या दिवाळी सणासाठी राज्यातील गोरगरीब शेतकरी व सामान्य जनतेला स्वस्त धान्य दुकानातुन मिळणारे मोफत गहु, तांदूळ, साखर अद्याप वाटप झालेले नाही. बीड शहरातील फक्त ६२ दुकानातुन धान्य वाटप करण्यात आले. तर ग्रामीण भागातील एकही दुकानातुन धान्य वाटप झालेले नाही. गोरगरीब जनतेला मूठभर साखर देण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नसल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला.

           मस्के यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,दिवाळीच्या सणासाठी गहु देखील दिले नाहीत. गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप करण्याचा प्रताप राज्य सरकारने केला आहे. दिवाळीच्या सणासाठी तरी राज्य सरकार संवेदनशीलतेने सामान्य जनतेचा विचार करुन किमान गहू, तांदूळ,साखर, तेल देऊन गरीबांची दिवाळी गोड करेल अशी अशा होती. परंतु सत्तेमध्ये मशगुल सत्ताधीशांनी जनतेला वाऱ्यावर सोडले. स्वत:ची दिवाळी साजरी करण्यात दंग झाले. कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे गोरगरीब जनतेला मुठ भर साखर देण्याची ऐपत ऊरली नाही अशी खरमरीत प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement