Advertisement

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर राजकीय चर्चांचे गुर्‍हाळ;मदतीच्या नावाने शिमगाच

प्रजापत्र | Tuesday, 22/09/2020
बातमी शेअर करा

अशोक शिंदे
नेकनूर दि.21 : बीड जिल्ह्यात मागीलवर्षभरात शेतकर्‍यानंा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधी अतिवृष्टीचा फटका तर कधी भाव कोसळल्याचा प्रश्‍न, कधी बियाण्यात फसवणूक तर कधी आणखी काही या प्रत्येक वेळी राजकारण्यांची पत्रके, भेटी आणि राजकीय चर्चांचे गुर्‍हाळ वर्षभर चालत आले असले तरी शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मदतीच्या नावाने मात्र शिमगा असल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांसमोरच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. शेतकरी आणि दुध उत्पादक यांना मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या आस्मानी आणि सुलतानी संकटानंा सामोरे जावे लागले. शेतीमालाचे कोसळलेले भाव असतील किंवा कोरोनाच्या काळात शेतातील भाजीपाला आणि फळे रस्त्यावर फेकून देण्याची आलेली वेळ, अतिरीक्त दुधाचा निर्माण झालेला प्रश्‍न, अतिवृष्टीमुळे पिकांना बसलेला  फटका आणि सोयाबिनचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकर्‍यांचे झालेले नुकसान या वर्षभरातील प्रमुख घटना म्हणता येतील. या प्रत्येकवेळी राजकारण्यांनी पत्रके काढली. राजकीय चर्चांचे गुर्‍हाळ झडले. काही ठिकाणी पंचनाम्यांचे कागदी घोडे देखील नाचविले गेले पण यातील कशातूनच शेतकर्‍यांना थेट मदत मिळालेली नाही. राजकीय चर्चेच्या गुर्‍हाळात मदतीच्या नावाने शिमगा होत असल्याने शेतकरी अस्वस्थ होत आहेत.

Advertisement

Advertisement