Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आज रंगणार सनराइज हैद्राबाद सामना

प्रजापत्र | Monday, 21/09/2020
बातमी शेअर करा

मुंबई-आयपीएल २०२० च्या तिसर्‍या सामन्यात आज विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आणि डेव्हिड वॉर्नर कर्णधार असलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ आमने सामने असतील. हा सामना सोमवारी 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आरसीबी आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात एकूण 15 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 8 सामने सनरायझर्स हैद्राबाद संघाने जिंकले आहेत. तर आरसीबी संघाने 6 सामने जिंकले आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादला आरसीबी विरुद्ध 9 वा सामना जिंकण्याची संधी असेल. त्याचबरोबर आरसीबीला हैद्राबादविरुद्ध 7 व्या विजयाची संधी असेल.
दोन्ही संघात बरेच सामने जिंकून देणारे खेळाडू आहेत, त्यामुळे चांगला अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. आरसीबीकडे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखे खेळाडू आहेत. त्याचबरोबर सनरायझर्सकडे डेव्हिड वॉर्नर, राशिद खानसारखे खेळाडू देखील आहेत.

खेळपट्टी कशी असेल?
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी स्पिनर्ससाठी उपयुक्त आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांसाठी फारसे काही नाही, परंतु फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवरुन बरीच मदत मिळू शकते.प्रथम फलंदाजी करणार्‍या संघानेही या खेळपट्टीवर 160 धावा केल्या तर ती खूप चांगली धावसंख्या असेल. दोन्ही संघांत अनेक दर्जेदार फिरकीपटू आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचे फिरकीपटू या खेळपट्टीचा फायदा घेऊ इच्छित आहेत.

हवामान कसे असेल?
या सामन्यात चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे हवामान खात्याच्यानुसार पावसाची शक्यता नाही. सोमवारी दुबईत तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. आर्द्रता 51 टक्के असेल आणि ताशी 24 किमी वेगाने वारे वाहतील.

सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, मनीष पांडे, विजय शंकर, रशीद खान, मोहम्मद नबी, अभिषेक सिंग, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, शाबाज नदीम, बिली स्टॅनलेक , बॅसिल थंम्पी, टी नटराजन, विराट सिंग, प्रियम गर्ग, फॅबियन एलन, मिशेल मार्श, संदीप भावंका, अब्दुल शमाद

आरसीबी: विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरकीरत मान, देवदत्त पद्धिकल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, आरोन फिंच, पवन देशपांडे, ऍडम जॅम्पा, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, शाहबाज अहमद, जोशुआ लिटल.

 

Advertisement

Advertisement