बीड दि.28 : बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व बीड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि.28) सकाळी छापा मारला. या छाप्यात कोट्यावधी रुपयांची बनावट दारुसह मशनरी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
बीड शहरालगत असलेल्या गोदामांमध्ये देशी दारू बनवली जात होती. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले व ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार या गोदामावर छापा मारत बनावट दारूचा मशनरीसह कोटींच्या पुढे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक संतोष राजपूत यांच्यासह कर्मचारी भानुदास वाघमारे, अंकुश वरपे, रवींद्र जाधव, यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा