मागील काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्व सामान्यांपासून ते अगदी मंत्रीमहोदयांना देखील याचा फटका बसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झालं आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विटकरून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, याप्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार देखील नोंदवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.” असं धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.
याचबरोबर, मी धनंजय मुंडे या माझ्या अधिकृत फेसबुक पेजवरील अॅडमिन किंवा मॉडरेटरचा अॅक्सेस गमावला आहे. तरी फेसबुकने यामध्ये त्वतरीत लक्ष घालून मला अॅडमिनचा अॅक्सेस परत द्यावा. अशी विनंती देखील फेसबुकला करण्यात आली आहे.