Advertisement

राक्षसभुवन येथे अवैध वाळू वाहतूक करणारे पाच हायवा तहसीलदारांनी पकडले

प्रजापत्र | Tuesday, 26/10/2021
बातमी शेअर करा

 

 

गेवराई दि २६ ( अविनाश इंगावले) 

तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज मंगळवारी सकाळी गोदापात्रातून हायवामधून अवैध वाळू घेऊन जात असताना  तहसिलदार यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी पाच हायवा जप्त केल्या असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांनी प्रजापत्रशी बोलताना दिली.

या कारवाईमध्ये दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची  माहिती असून यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. या पकडलेल्या हायवावर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले असून सदरच्या पाच हायवा गाड्यांपैकी एका हायवाच्या चालकाने पलायन केले असल्याने ती गाडी घटनास्थळावरच आहे  त्या ठिकाणी महसूल व पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. उर्वरित चार गाड्या ह्या तहसील कार्यालयात आणल्या असल्याचे देखील तहसिलदार यांनी सांगितले आहे .

 याबाबत अधिक माहिती अशी की , गेल्या अनेक दिवसांपासून महसूल प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन तालुक्यातील राक्षसभुवन (शनिचे) याठिकाणी अवैध वाळू उपसा करून त्याची तस्करी करण्यात येत होती परंतु प्रशासन पोहचेपर्यंत ह्या हायवा पळून जात होत्या आज पहाटे पासूनच गेवराई महसूलचे तहसिलदार सचिन खाडे व त्यांचे सहकारी त्यांना पकडण्यासाठी दबा धरुन बसले होते सदरच्या पाच हायवा एकापाठोपाठ गोदापात्रात उतरल्यानंतर महसूल पथकाने त्यांना पकडले याच ठिकाणी तहसिलदार यांनी काही दिवसांपूर्वी सतरा हायवा गाड्या पकडल्या होत्या आणि आज पाच हायवा पकडल्या आहेत यामध्ये एकूण दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही सर्व वाहने तहसील कार्यालयात आणली आहेत .

Advertisement

Advertisement